तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 चे माजी मुख्याध्यापक कै. दिगंबरराव कावरे गुरुजी यांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 5:00 ते रात्री 8:30 या कालावधी क्रांती लॉज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. हेडगेवार रक्तपिढीचे सदस्य महेंद्र कावरे यांनी दिली आहे. यामध्ये जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कै.दिगंबरराव कावरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ 2004 पासून 2024 पर्यंत 20 वर्षाच्या कालावधीत 1768 रक्तदात्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केले आहे.