धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थीदशेत सहलीचे प्रत्येकालाच आकर्षण असते. येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची  दरवर्षी शैक्षणिक सहल कुठल्यातरी प्रकल्पाला भेट देत असते. या प्रकल्पामधूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात ज्ञान मिळाल्याने ज्ञानामध्ये आणि कौशल्यामध्ये नक्कीच भर पडते. यावर्षीही मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव, सौर ऊर्जा प्रकल्प केशेगाव व  व  पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प धाराशिव, येथे नुकतीच भेट दिली. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. विक्रमसिंह मानेव, अकॅडमिक डीन आणि   मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.  या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थी व  प्राध्यापकांचा  विशेष सहभाग होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव येथे विद्यार्थ्यांनी पारंपारिक ऊर्जा प्रकल्प, साखर निर्मिती प्रकल्प, को जनरेशन प्रकल्प, डिस्टलरी  प्रकल्प, बायोगॅस प्रकल्पाची माहिती घेतली. भेटी दरम्यान विविध मशिनरी आणि प्रोसेस  संदर्भात, कारखान्याचे इंजि. श्री. ढवण साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच दरम्यान केशेगाव येथीलच सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पास भेट देऊन अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी कारखान्याचे साईट इंजि. श्री जगदाळे साहेब यांनी सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाची माहिती दिली.

शैक्षणिक सहली दरम्यान धाराशिव येथील सोरिन व सिरँटीका पवन ऊर्जा प्रकल्पास सर्व चमुने भेट देऊन पवन ऊर्जा निर्मिती संदर्भात माहिती घेतली. या संदर्भात कंपनीच्या वतीने श्री देशपांडे , कृष्णा जाधव व आशुतोष सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सहली संदर्भात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  माने म्हणाले की  सौर ऊर्जा व पवन ऊर्जा हे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सौर ऊर्जा निर्मिती हा आपल्या भागामधील एकमेव स्रोत आहे. याचा लाभ घ्यावा. येणाऱ्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतचा व्यवस्थित वापर करणारा देशच पुढे जगाचे नेतृत्व करू शकतो आणि महाविद्यालयाचा मेकॅनिकल विभाग हा त्यासंदर्भात लागणाऱ्या सुख सुविधांनी परी पूर्ण असून येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्रात मेकॅनिकल ब्रँचच दबदबा राहील.

मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते  यांनी पण विभागातर्फे औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित असणारे मेकॅनिकल इंजिनियर आपल्या तेरणा महाविद्यालयातर्फे कसे मिळतील या दृष्टीने कटिबद्ध असल्याचे तसेच पेट्रोल व डिझेलचा होणारा रास व त्यावरील उपाय म्हणून अपारंपारिक ऊर्जा स्तोत्र याची होणारी औद्योगिक क्षेत्राला मदत ओळखून महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागामध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत या संदर्भातील विषयाचे नियोजन करण्यात येत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अपारंपारिक ऊर्जा स्तोत्र निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पॅकेज मिळून नोकरी मिळणे शक्य होणार आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही व्ही.  माने यांनी केले आहे.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे लवकरच पवन ऊर्जा व सोलार ऊर्जा या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्ट करून घेऊन प्रोजेक्टची रूपांतर स्टार्ट अप मध्ये करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना पवन ऊर्जा व सोलर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये  नोकरीची संधी मिळणार आहे. त्या दृष्टीने कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही व्ही. माने सर, डीन अकॅडमिक्स व मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते सर, ट्रेनिंग अँडप्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.जगताप सर हे कार्य करत असून विद्यार्थ्यांना अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक सहलीचे नियोजन प्रा एस पी बिराजदार आणि प्रा एस डी शिंदे यांनी केले.


 
Top