धाराशिव (प्रतिनिधी)- समर्थ अर्बन को. ऑप. बँक लि. धाराशिव या बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. व्यंकट गुंड तर उपाध्यक्ष पदी ॲड. निवृत्ती कुदळे यांची निवड झाल्याबद्दल समर्थ अर्बन को. ऑप. बँक लि. धाराशिवच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही निवड सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी डॉ माधव अंबिलपुरे, कक्ष अधिकारी डी. ये. जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तद्पूर्वी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली..
यावेळी बोलताना ॲड. व्यंकट गुंड यांनी रुपामाता उद्योग समूहाने शेतकरी व ठेवीदारांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे तसेच अल्प कालावधीमध्ये ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र राहून उत्तम कार्य चालत असल्यामुळे आपण समर्थ अर्बन को. ऑप. बँकेच्या भविष्यातील प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले. आईच्या निधनानंतर आपण चांगल्या कार्याच्या रुपाने आईची सतत आठवण राहावी म्हणून स्थापन केलेल्या सर्वच उपक्रमाला ठेवीदार सभासद व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळत असल्यामुळे मी हे करू शकल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात जसे संपूर्ण जिल्ह्यात व जिल्हयाबाहेर रूपामाता समूहाचे नवलोकिक आहे तसेच नाव आपण समर्थ अर्बन को. ऑप. बँकेचे करू व त्याचे जाळे जिल्ह्याभरात पसरवू असेही बोलताना ॲड. व्यंकट गुंड म्हणाले. समर्थ अर्बन को. ऑप. बँक लि. धाराशिव ही रूपामाता समुहामध्ये विलीन झाल्याबदल ॲड. व्यंकट गुंड यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंदजी पाटील, माजी उपाध्यक्ष अशोक उर्फ रवि त्र्यंबक पाटील, रामदास कोळगे, रूपामाता समूहाचे कार्यकारी संचालक अजित गुंड, कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, धनंजय कुलकर्णी, देविदास जाधव, रणजीत कोळपे पाटील, शरद गुंड, विशाल गुंड, व्यंकट मरगणे सर, राठोड सर, अविनाश मुंढे, सर्व आजी, माजी संचालक, सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.