तुळजापुर (प्रतिनिधी)- दिनांक 29 मार्च रोजी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागात ‘शेअरपॉइंट टेक्नॉलॉजी' विषयावरील वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अमोल भोरे (शेअरपॉइंट डेव्हलपर, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, मुंबई) यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले. प्राचार्य, उप-प्राचार्य आणि संगणक विभाग प्रमुख प्रा. वाघमारे डी. जे. यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वाघमारे यांनी केले. अमोल भोरे यांनी विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीची सखोल माहिती दिली व भविष्यात या क्षेत्रातील नोकरीच्या संधी व आव्हाने याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग कौशल्य प्रॅक्टिकल पातळीवर विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या दिशेने प्रेरित केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यात ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा. संतोष एकदंते यांनी आभार प्रदर्शनाद्वारे महत्त्वाची भूमिका निभावली. तसेच प्रा. रणखांब, प्रा. भोजने, प्रा. नयन कदम, प्रा. घोरपडे, प्रा. खपाले, नितीन कुलकर्णी व महेश नवगिरे यांच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी झाला. या वर्कशॉपमध्ये 75 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शेअरपॉइंट टेक्नॉलॉजी विषयावर सखोल ज्ञान मिळवण्याची संधी प्राप्त झाली.