धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा धाराशिव जिल्हा न्यायालय येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. प्रसाद जोशी यांनी ॲड. अमोल वरुडकर यांच्याकडे नूतन जिल्हा विधीज्ञ मंडळाचा अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला असून जिल्हा विविध मंडळाच्या नूतन अध्यक्ष पदाचा पदभार ॲड. अमोल वरुडकर यांनी स्वीकारला. 

यासोबतच उपाध्यक्षपदी ॲड. नितीन लोमटे व ॲड. प्रमोद वाकुरे, तर कोषाध्यक्षपदी ॲड. एन. डी. पाटील, सचिवपदी ॲड. अनिकेत देशमुख, सहसचिव पदी ॲड. भाग्यश्री रणखांब व महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. उज्वला इंगळे यांनी पदभार स्वीकारला आहे. याप्रसंगी नूतन कार्यकारणीचा माजी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद जोशी व कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी सदस्य ॲड.मिलिंद पाटील यांनीही यावेळी नूतन कार्यकारणीचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. या पदग्रहण समारंभास जिल्ह्यातील वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top