तुळजापूर (प्रतिनिधी)- पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे अमरावती संकुल स्तरीय स्पर्धेचा प्रारंभ सोमवार दिनांक २१ एप्रिल २५ रोजी करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सोलापूर प्राचार्य श्री संजय कोठाडी यांच्या करकमलो द्वारा हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
या स्पर्धा २१ व २२ एप्रिल २५ या दोन दिवस चालणार असून अमरावती संकुल मधील अकोला, बीड ,भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नागपूर, वाशिम, यवतमाळ ,लातूर ,नांदेड, परभणी सोलापूर ,धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये ३११ खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धा वयोगट १४, १७, १९ या वयोगटातील मुला मुलींमध्ये होणार आहेत. या अथलेटिक स्पर्धेमध्ये १००,२००,४००,६००, ८००,१५००,३०००,५००० मीटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, क्रॉस कंट्री, हॅमर थ्रो अशा वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या गटात घेण्यात येणार आहेत. यातून निवड झालेल्या स्पर्धकांना रीजनल खेळासाठी पुढे पाठवण्यात येणार आहे. या अथलेटिक्स खेळाच्या प्रसंगी मुख्य अतिथी श्री संजय कोठारी म्हणाले की, सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडून आपलं कौशल्य दाखवून आपल्या शाळेचं व मार्गदर्शक शिक्षकाचे नावलौकिक कमावण्याचे आव्हान केले हे करत असताना खेळाचे सर्व नियम पाळून सर्वजण आनंदाने खेळात सहभागी व्हा !अशा प्रकारच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सचिन खोब्रागडे, वरिष्ठ अध्यापक श्री चक्रपाणि गोमारे , क्रीडा अध्यापक रवींद्र अलसेट, श्रीमती सुनेत्रा अलसेट, श्री हरी जाधव उपस्थित होते.
या खेळासाठी पंच म्हणून श्री इसाक पटेल, श्री राहुल बोबडे, राहुल जाधव, राजेश जगताप अशोक चव्हाण, गणेश राठोड, दिनकर रोकडे, छाया घोडके, हे काम पाहत आहेत. . या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कॉमेंट्री श्री हरी जाधव ,सुजाता कराड, श्री सुरेश भोरगे यांनी अतिशय खुमासदार शैलीमध्ये करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धा पाहण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक वृंद उपस्थित होता. या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा अध्यापक आर एम अलसेट व श्रीमती एस आर अलसेट विशेष परिश्रम घेत आहेत.