धाराशिव (प्रतिनिधी) - क्षणार्धात झटपट पैसे कमविण्याची मोह असलेला चक्री मटका धाराशिव शहरात श सुरू असल्यामुळे त्याकडे अनेक तरुण आपोआप आकर्षिले जातात. मात्र त्यांना पैसे मिळण्याऐवजी कंगाल होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या संसाराची होळी होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये बोंबाबोंब होत असल्याचे दिसताच पोलिसांनी शहरात कारवाई करण्यास सुरुवात केली. दि. १८ एप्रिल रोजी एका चक्री मटका चालणाऱ्या ठिकाणावर धाड मारत रोख रकमेसह साहित्य जप्त केले. तर संबंधित चक्री मटका चालकास गजाआड केले आहे. पोलिसांनी सकारात्मक कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून असेच सर्व चक्रीचे धंदे उध्वस्त करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुगार विरोधी दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.१८ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ ते रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकले. शहरातील सांजा नगर परिसरातील रामनगर येथे हे ३.१५ वाजण्याच्या सुमारास पाथ्रुड चौकातील नाज हॉटेलमध्ये एका पत्राच्या शेडमध्ये चक्री मटका जुगाराचे साहित्य एकूण १६ हजार ६५० रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त करून त्या व्यक्ती विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कायदा कलम- १२ (अ) अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.