धाराशिव (प्रतिनिधी)- फ्लाईंग किड्स शाळेत विद्यार्थी, पालक, प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत 'ग्रॅज्युएशन डे' उत्साहात साजरा करण्यात आला. पालकांना आपल्या बालकांच्या प्रति असलेले कुतूहल, त्यांचे कौतुक आणि शैक्षणिक आयुष्याची सुरुवात म्हणून यू.के.जी. मधून इयत्ता पहिलीत प्रवेश घेत असणार्या बालकांसाठी शाळेत अनेक उपक्रम घेतले जातात. त्यातलाच एक प्रिप्रायमरी मधील अंतिम कार्यक्रम म्हणजेच ग्रॅज्युएशन डे'. ज्यात फ्लाईंग किड्स सी.बी. एस. ई. शाळेत अगदी लहान विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. विविध उपक्रम, त्यांचे मंचावरील धाडस, वक्तृत्व अश्या विविध गोष्टींचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी पात्रता म्हणून निकाल पत्रकासह विशेष प्रावीण्य प्रगतिपुस्तक व विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शालेय शैक्षणिक वर्गात विद्यार्थ्याकडून अनेक स्पर्धा, कार्यक्रम, सादरीकरण, परीक्षा असे विविध उपक्रम घेत प्रिप्रायमरी मधून ग्रॅज्युएट करून विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या पुढील प्राथमिक वर्गात गुणवत्तापूर्ण पात्रता मिळून देण्यात विद्यालयाच्या प्रिप्रायमरीच्या शिक्षिका आकृती मिश्रा, मीनाक्षी कुलकर्णी, अपर्णा मिश्रा यांनी अथक परिश्रम घेतलेले दिसून येते. याचबरोबर पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्याची प्रगती त्यांचा मूलभूत पाया पक्का करणे या उद्देश्याकडे विशेष लक्ष देत शैक्षणिक वर्ष आनंदी व गुणवत्तापूर्ण पार पडला यासाठी विद्यालयाचे व संबंधित शिक्षिकांचे विशेष कौतुक होत आहे. दिनांक ०१ एप्रिल २०२५ सी. बी. एस. ई. चे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून फ्लाइंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अद्याप सुरुवात झाली आहे.
प्रिप्रायमरी मधून ग्रॅज्युएट होऊन पुढील प्राथमिक वर्गासाठी पात्र विद्यार्थ्यांचे समस्त पालक वर्ग, शिक्षक - शिक्षिका वर्ग, प्रशासकीय वर्ग, तसेच विद्यालयाचे संचालिका डॉ. मंजुळा आदित्य पाटील व प्राचार्य चतुर्वेदी यांनी कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.