परंडा (प्रतिनिधी)-परंडा येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली.बोधगया महाविहार कायदा 1949 हा रद्द करावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मुख्य मागण्या च्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी व फुले आंबेडकर विद्वत सभा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. प्रकाश सरवदे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे परंडा शहराध्यक्ष किरण दादा बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी दहा वाजल्यापासून या स्वाक्षरी मोहिमेत सुरुवात करण्यात आली होती.यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सरवदे आणि जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी महाबोधी महाविहार स्वाक्षरी मोहिमेत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 
Top