धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या सोडतीमुळे धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण गावगाडा ढवळून निघाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सरपंचपदाचे स्वप्न पाहणाऱ्या काही गाव पुढाऱ्यांना पद आरक्षित झाल्यामुळे धक्का बसला तर काही ठिकाणी सरपंचपद खुले झाल्यामुळे जोरदार फाईट रंर्गीार आहे. दरम्यान जिल्ह्यात 629 ग्रामपंचायतीचे गाव कारभारी कोणत्या जातीच्या प्रवर्गातून होणार हे निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीमुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 621 ग्रामपंचायतींच्या सरपंचाच्या पदाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खुल्या प्रवर्गासाठी 342 ग्रामपंचायती ठेवण्यर्चीं आल्या असून, यामध्ये 171 पदावर महिलांची वर्णी लागणार आहे. यासोबतच अनुसूचित जातीसाठी 100 पदे आरक्षित झाले असून, यापैकी 50 जागांवर त्याच प्रवर्गातील महिला सरपंच होणार आहेत. अनूसूचित जमातीसाठी जिल्ह्यात 13 जागा आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी सात जागा महिलांना देण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 166 जागा आरक्षित झाल्या असून, 83 ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील महिला सरपंच विराजमान होणार आहेत. जवळपास सर्वच तालुक्यामध्ये शांततेत आरक्षणाची सोडत करण्यात आली. काही अपवाद वगळता विशेष आक्षेप नोंदवले गेले नाहीत. 


रंगतदार लढती होणार

राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या धाराशिव तालुक्यातील ढोकी, रूईभर, कसबे तडवळा, पाटोदा ही गावे खुली झाली आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी बेंबळी, कनगरा, करजखेडा, बोरखेडा ही गावे उपलब्ध झाली आहेत. यामुळे या सर्व ठिकाणी रंगतदार चुरस पाहण्यास मिळणार आहे. पाडोळी (आ.), अनसुर्डा, येडशी, तेर येथे अनेक मातब्बर रिंगणात होते. मात्र ओबीसीसाठी आरक्षण झाले. तसेच कोंड, उपळा (मा.), काजळा, सांजा, वडगाव (सि.) गावे ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगणार आहे. 

 
Top