तुळजापुर (प्रतिनिधी)- शहरात सार्वजनिक मोठ्या जल्लोषात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून महाद्वार,बोंबला चौक, किसान चौकी,आर्य चौक, कमान वेस मंगळवार पेठ ते डॉ.बाबासाहेब चौक मार्गावर जय बजरंग जय वडार युवा प्रतिष्ठान तर्फे भव्य मिरवणूक काढून सांगता करण्यात आली.
हनुमान जन्मोत्सव सोहळा 12 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात आला. या मिरवणुकीत हनुमान मूर्तीची नगर प्रदर्शना काढण्यात आली. ड्रोनच्या सहाय्याने बाल हनुमानाची उड्डाण आकर्षन बनले होते,पारंपरिक वाद्यासह सामूहिक नृत्याविष्कारात हनुमान भक्तांनी आपला सहभाग नोंदवला.
मिरवणूक आरती महंत मावजीनाथ बाबा,प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,युवा तालुका अध्यक्ष आनंद कंदले,माजी नगरसेवक विजय कंदले,रामचंद्र रोचकरी,यांच्यासह जय बजरंग जय वडार युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रावण पवार, लक्ष्मण पवार,धर्मराज पवार यांच्या सह उत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ पवार, उपाध्यक्ष बाळू शिंगे,कोषाध्यक्ष सनी इटकर, मिरवणूक प्रमुख सुरज इटकर,तुकाराम देवकर, मशा काका पवार, चंद्रकांत पवार,राम देवकर, संदीप पवार आदी शेकडो सदस्य मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.