परंडा (प्रतिनिधी) - येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे शनिवार दि.5 रोजी चक्रवर्ती अशोक सम्राटांची जयंती मोठया उत्साहत साजरी करण्यात आली.

यावेळी डी.बी.ए.समूहचे संस्थापक अध्यक्ष  दयानंद बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मोहन बनसोडे, डी.बी.ए मीडिया प्रमुख अमर गायकवाड, जय मल्हार कामगार संघटनेचे भूम परंडा वाशी तालुकाप्रमुख मोहम्मद शेख, संजय सरवदे, यांच्या हस्ते सामुदायिक चक्रवती अशोक सम्राट  यांच्या  प्रतिमेचे दीप धूप लावून पूजन केले. याप्रसंगी चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे, ॲडवोकेट दयानंद धेंडे, मोहन  बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित दादा कोळी ,हरिभाऊ गोडगे ,छगन चौधरी, रवींद्र शिंदे, सम्यक धेंडे, सूर्योदय सरवदे, धर्मराज नरोटे,कालिदास काशीद, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार दयानंद बनसोडे यांनी मानले.


 
Top