धाराशिव,(प्रतिनिधी)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग चौदाव्या वर्षी दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील काकडे प्लॉट परिसरातील सोनाई फंक्शन हॉल येथे 9 व 10 एप्रिल रोजी दोन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे. पहिल्या दिवशी बुधवारी प्रसिध्द विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विषयक विचार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा हे असणार आहेत. दुसर्या दिवशी गुरूवार, 10 एप्रिल रोजी मुंबई येथील संविधान अभ्यासक प्रा. अॅड. जयमंगल धनराज यांचे ‘भारतीय संविधानाची 75 वर्षे ः वाटचाल, सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मनोहर सिरसाठ हे असणार आहेत. व्याख्यानमालेस शहर व परिसरातील नागरिक, युवक-युवतींनी उपस्थित रहावे, असे आवाहन विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे.