भूम (प्रतिनिधी)- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या सजावटीचा मान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानला मिळाला होता. कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या सहचारीणी आईसाहेब संयोगिताराजे भोसले यांच्या आदेशाने हा मान भूमकरांना मिळाला होता. ही पुण्यतिथी गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, किल्ले रायगड येथे संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमकरांकडून 8 वर्षांपासून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृती दिन साजरा केला जातो. यावेळी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूम यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीची सजावट करण्यात आली . तसेच किल्ले रायगडाची स्वच्छता करण्यात आली. आरास करण्यासाठी लागणारी विविध फुले पुणे येथून आणण्यात आली होती. या पुण्यतिथीचे आयोजन शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडच्या माध्यमातून करण्यात आले होते. तसेच पाचाड व हिरकणवाडी येथे शाळेतील विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्यासह कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे,रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान च्या या कामाचे छत्रपती संभाजी महाराज यांनी विशेष कौतुक केले. यामध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक विठ्ठल बाराते, शुभम पवार, तेजस औताडे, अनिकेत आकरे, ऋतुराज खानविलकर, अभिजित सुरवसे, आनंद गाढवे, अभिषेक कराळे, प्रसाद कराळे, गौरव बोराडे, शाहू गुंड, अशोक साळुंके, शिवप्रताप गुंड, अक्षय मांगले, आशिष चव्हाण, मार्तंड देशमुख,सौरभ रेंगे,अभिषेक पाटील, शंतनू माळी,सार्थक गाढवे, स्वप्नील औताडे, गणेश भोळे, राम कुंभार, सुधीर देशमुख, ओंकार पवार यांच्या सह पदाधिकारी हजर होते.