तुळजापुर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी येथील पाच विद्यार्थी राष्ट्रीय सुवर्ण बान परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.

बीट स्तरीय सावित्री ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2024 -25 च्या कार्यक्रमात प्रमाणपत्र ,शाल, व गुच्छ देऊन कार्तिक ढगे,सार्थक चव्हाण,आशुतोष चव्हाण,समर्थ सुरडे,शिवराज चव्हाण मार्गदर्शक शिक्षक कब मास्टर सुखदेव भालेकर, भोयटे बलभीम यांचा प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्मान अशोक पाटील,गटशिक्षण अधिकारी सन्मान अर्जुन जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ कळलावे,प्रा. श्रीमती अंजली सुर्यवंशी ,संचालिका महानंदा माने,विस्तार अधिकारी जंगम, मल्लिनाथ काळे, मल्हारी माने,तात्यासाहेब माळी, चेअरमन सुर्यवंशी सर,शिक्षक नेते लालासाहेब मगर आदी उपस्थित होते.


 
Top