तुळजापुर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नांदुरी या शाळेतील सण 1992 च्या सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात पार पडला. पुन्हा एकदा जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नांदुरी चा 7 चा वर्ग बत्तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी वर्ग भरला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पोतदार गुरुजी हे होते तर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सिद्धलिंग राजमाने, माजी सरपंच महादेव सरडे यांची उपस्थिती होती. यावेळी सन 1992 या सातवी व आठवण वर्गाला शिकवणारे शिक्षक बलभीम कांबळे, बाजीराव जाधव,दासराव भोकरे, अरुण बनसोडे, भागवत पांचाळ, करीम शेख आदी सेवानिवृत्त गुरुजन उपस्थित होते. 

यावेळी जमलेल्या मित्र-मैत्रिणींनी आपली मनोगत व्यक्त केली. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असलेल्या सर्व वर्ग मित्र-मैत्रिणी यांचा सत्कार गुरुजनांच्या हस्ते यावेळी पार पडला.सूत्रसंचालन अबाई कांबळे यांनी. प्रास्ताविक डॉ फुलचंद यमगर तर आभार ज्ञानेश्वर सरडे यांनी मानले. 

यावेळी शिवाजी सरडे, विजय पाटील, विपिन सुरवसे , विकास पाटील, दयानंद पाटील, तानाजी भांडेकर, हनीफ शेख, विठ्ठल मुळूक, मच्छिंद्र यमगर, करीम शेख, मनीषा मुळे, कविता साखरे, मंदाकिनी सरडे, मंगल मुळे, अनिता पाटील, सुजाता सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


विशेष सत्कार अन शाळेला भेट 

सन 1992 वर्गातील शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. फुलचंद यमगर व अक्कलकोट येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले विपीन सुरवसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत सहा सिलिंग फॅनची भेट देण्यात आले.

 
Top