तुळजापुर (प्रतिनिधी)- गाव म्हटलं की ग्रामदैवत आलंच, तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुकच्या ख्वाजा बंदेनवाजची यात्रेला जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. मुळात हिंदू बहुसंख्य असलेल्या आरळी गावात मुस्लिम ग्रामदैवताची यात्रा सर्व धर्मातील लोक उत्साहाने साजरे करतात.

तंत्रज्ञाचा विकास होण्यापूर्वी गावखेडी संस्कृती व परंपरा यांनी समृद्ध होती.  उन्हाळ्यात खळेदळे झाले की ग्रामदैवतांची यात्रा साजऱ्या केल्या जायच्या. यात्रा साजऱ्या होण्यामागचा उद्देश हाच होता की माणसं एकत्र यायची, कामामधून वेळ भेटायचा, यात्रेनिमित्त सासुरवाशीण असणाऱ्या लेकीबाळी आपापल्या माहेरी यायच्या , माणस आपली सुख-दुख एकमेकांसोबत वाटायची. यात्रेनिमित्त गावामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजनदेखील होत असायचे. 

आरळी बु गावाला फकीर नसल्यामुळे त्या काळात बंदेनवाजाच्या फकिरीचा मान चिंचोली गावातील फकीर यांना मिळाला. गावातील जुन्या जाणकरांच्या चर्चेतून यात्रेबद्दल अनेक गोष्टी समजल्या पूर्वी गावामध्ये यात्रा असली की, कुस्त्या , भाकरीवरील तमाशा इत्यादी असायचे पुढे तंत्रज्ञान विकसित झाल त्याप्रमाणे गावात पडद्यावरील चित्रपट दाखवल जायचे. गावची सध्याची ग्रामपंचायत जिथे आहे तिच्या पाठीमागील मोकळ्या शेतात शोभेचे दारुकाम केल जायच फटाक्यांची आतषबाजी केली जाते. आजही प्रतिवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे यात्रा कमिटीच्या माध्यमातून आयोजन केले जाते.

आरळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत ख्वाजा बंदेनवाज यात्रेची सुरुवात संदलने सुरू होते आज देखील ही परंपरा कायम आहे. आताही आरळीतील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी करतात, गावात असणारी सर्वधर्म समभावाची परंपरा गावातील जुन्या पिढीकडून मिळालेला वारसा नवी पिढी नक्की जपेल भविष्यातही ग्रामदैवत ख्वाजा बंदेनवाज यात्रा आणखी उत्साहात साजरी केली जाईल. 


सांस्कृतिक वारसा जपणारे गाव

आरळी बु गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेला असल्याने अनेक दिग्गज कलाकार जसे की निळू भाऊ फुले, डॉ.श्रीराम लागू, वसंत शिंदे,अरुण सरनाईक,गणपत पाटील,राम नगरकर,ज्योती चांदेकर यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावलेली  होती. गावात नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व्हायचे. गावामध्ये शामराव भाऊ व्हरकट यांचा लोकरंजन संगीत मेळा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण होत होते. राज्यस्तरीय फेस्टिव्हल असो वा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जात. वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेले अनेक कलाकार अन कलावंतांनी गावचं नाव देशभर केलं असल्याचं गावकरी अभिमानाने सांगतात.

 
Top