भूम (प्रतिनिधी)- ईट तालुका भूम येथील मंगल आप्पासाहेब चव्हाण या 2009 पासून गेली 16 वर्ष आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ईट येथे प्रथम आशा कार्यकर्तीचा मान जातो. जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे दि.28 नियोजन समिती सभागृह येथे कोरोना कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव समारंभ संपन्न झाला. कोरोना कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट आशा कार्यकर्ती जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, भूम तालुका आरोग्य अधिकारी अमोल शिनगारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंगल चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. मंगल चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर ईट व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

 
Top