भूम (प्रतिनिधी)- कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता मंत्रालय महाराष्ट्र शासन अंतर्गत आचार्य विद्यासागर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम इन्स्टिटय़ूट मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समिती शासन नियुक्त अशासकीय सदस्य पदी मा.श्री प्रदीप साठे यांची निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्य तसेच विविध समाजबांधवाकडून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षांव होत आहे
प्रदीप साठे हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत विधानपरिषद मा.आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब व भा.ज.पा.नेते मा.बाळासाहेब क्षीरसागर यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्य आहेत जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात व परिसरात शासनाच्या विविध योजनां तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करत आहेत तसेच परिसरातील ग्रामीण भागातील युवकांना स्वताच्या पायावर उभा राहून आपला काहीतरी व्यावसाय उभा करता यावा याकरिता देखील जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण देवून युवकांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या या कामाचा लेखाजोखा पाहुन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.