भूम (प्रतिनिधी)-  धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा संत चोखामेळा समता पुरस्कार भूम येथील आदिवासी पारधी समाजातील हभप अरुण काळे महाराज यांना जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

अधिक माहिती की, संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 2025 या वर्षीचा संत चोखामेळा समता पुरस्कार हभप अरुण काळे महाराज भूम, डॉ. ओम श्रीदत्तोपासक यांना संत सोयराबाई प्रबोधन पुरस्कार तर परिवर्तनवादी लेखिका छाया बेले यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक सचिन पाटील यांनी दिली. 

संत चोखामेळा समता पुरस्कार वितरण सोहळा रविवार 18 मे  2025 रोजी सायंकाळी 5 वा. बाळासाहेब ठाकरे कलादालन सभागृह, पुणे येथे  तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील जगप्रसिद्ध विश्वपुण्यधाम (कैकाडी महाराज मठ) चे विद्यमान मठाधिपती गुरुवर्य हभप भारत महाराज जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत चोखामेळा दिंडी सोहळा प्रमुख हभप. बापूराव सांवंत महाराज तर संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामदास चवरे आणि डॉ. दत्तात्रय डुंबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

 
Top