धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित  नूतन प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी  गुरुवर्य के.टी.पाटील सर यांच्या नावाने सुरू के.टी.पाटील प्रज्ञा शोध परीक्षा 2025 या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

चि.आर्यन अनंत नाईकनवरे 150  गुण घेऊन  राज्याच्या गुणवत्ता यादी मध्ये प्रथम आला आहे. तर म्हेत्रे प्रणव टेकाळे, प्रसन्न पवार, आरुषी, क्षिरसागर राजवीर,पाटील रुद्र ,जाधव कबीर या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या यादीमध्ये यश संपादन केले आहे तसेच शेख जमीर, वीर ऋषभ, सावळे आदित्य, थोडसरे स्वरा,कुठार शुभ्रा,भातलवंडे प्रणव, येळवे वेदांत, पिंपळे साक्षी, पाटील आराध्या,सांगुळे तनिष्का, फावडे शौर्य केंद्राच्या यादीमध्ये यश संपादन केलेले आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी संतोष माळी, प्रवीण गोरे, दिपाली राऊत यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांचाही सत्कार या प्रसंगी मान्यवरांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील या अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, राम मुंडे जिल्हा समन्वयक हे उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी अभिनंदन केले.

 
Top