भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात कार्यरत समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी बोराडे यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. समाजशास्त्र विषयावर संशोधन व अनेक संशोधकपर लेख तसेच विविध सामाजिक संशोधन अहवालावर त्यांचे कार्य चालु असुन नुकतेच त्यांच्या एक लघुशोध अहवालास अनुदान ही प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळ पाथरुडचे अध्यक्ष डॉफ उद्धव बोराडे, उपाध्यक्ष डि.डी. बोराडे, सचिन मुरलीधर काटे, सहसचिव तथा प्राचार्य संतोष शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.