धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथील पथकाने सदिच्छा भेट दिली.
या पथकामध्ये मुख्याध्यापक एम. आर. नटवे, सहशिक्षक एस. ए. कांबळे, बी. एम. सोनवणे, आर. ए. बिराजदार, जी. एस. भोपी आदींचा समावेश होता. यावेळी मुख्याध्यापक एम.आर .नटवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून श्रीपतराव भोसले हायस्कूलचा महाराष्ट्रभर असलेला नावलौकिक तसेच विद्यालयांमध्ये चालणारे नवनवीन शैक्षणिक उपक्रम जसे की जेईई व एनईईटी (नीट) साठी चालणारे फिजिक्स वालाचे वर्ग, प्रशस्त वर्गखोल्या, डिजिटल वर्गखोल्या, विद्यालयाची शिस्त, शिक्षक-विद्यार्थी यांची शिस्त व गणवेश, सर्व सोयींनी सज्ज असलेली शालेय इमारत, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, सीसीटीव्ही इत्यादी गोष्टींचे कौतुक केले. या प्रसंगी प्राचार्य एन. आर. नन्नवरे सर यांनी विद्यालयाची गुणवत्ता, प्रशासन व कामकाज, आतापर्यंत घडविलेले विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेले खेळाडू व त्यांना मिळालेले पुरस्कार तसेच क्रीडा शिक्षकांना मिळालेले पुरस्कार याविषयी माहिती सांगितली. यावेळी उपप्राचार्य एस. के. घार्गे, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे, स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम, पर्यवेक्षक डी. ए. देशमुख, पर्यवेक्षक निखिल गोरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी देखील उपस्थित होते.