धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्या कुटुंबातील मार्गदर्शक, राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार (आजोबा) यांच्या निधनाच्या दुःखातून आपण अद्यापही सावरलेलो नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आपल्या कुटुंबाचे सदस्य असलेलेच कार्यकर्ते लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात सहभाग घेऊन कर्तव्य पार पाडत आहे. याच अनुषंगाने खामसवाडी येथे जिल्हा परिषद गटाचे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार श्री. विश्वास कोकणे, पंचायत समितीचे उमेदवार श्री. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

देशात, राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून खामसवाडी गटातील विकासकामांना निधी मंजूर करून घेण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेतून जास्तीचा निधी आपल्या मतदारसंघात खेचून आणण्यासाठी या गटातील सदस्य हे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या विचारांचे असले पाहिजेत. ज्यांना समाजातील तळागाळातील लोकांच्या परिस्थितीची, त्यांच्या अडचणींची जाणीव आहे, असे महायुतीचे उमेदवार श्री. विश्वास कोकणे यांना भरभरून मतदान करून तुमच्यातील एक सहकारी आदरणीय राणादादांच्या सोबतीला पाठवा. त्यामुळे आपली कामे करण्यास कुठेही अडचण येणार नाही. यावेळी खामसवाडी गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top