नळदुर्ग (प्रतिनिधी)- दि. 30 एप्रील 2025 रोजी धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी भेट असून या निमीत्ताने नळदुर्गला आल्यानंतर नळदुर्गच्या बसस्थानकात चोवीस तास वाहतुक निरीक्षकाचे पद दयावे. त्याच बरोबर बसस्थानकाच्या बाजूने बसस्थानकाला बसलेला अतिक्रमणाचा विळखा तात्काळ दुर करावा. अशी मागणी शहरवाशीयांतून केली जात आहे.

बुधवार दि. 30 रोजी धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा नळदुर्ग दौरा आहे. या दौऱ्यात ते नळदुर्गच्या एैतिहासीक किल्ल्याची पहाणी करणार आसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ते प्रथमच नळदुर्गमध्ये येत आसल्याने शहरवाशीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नळदुर्ग हे जवळपास पन्नास ते साठ गावाचा संपर्क असलेले शहर आहे. या ठिकाणी नळदुर्ग बसस्थानकात या सर्व गावांना एस टी बसने प्रवाशी प्रवास करीत असतात. त्यामुळे येथील बसस्थानकात सतत प्रवाशांची गर्दी असते. दरम्यान या ठिकाणी बसस्थानकात कायम चोवीस तास वाहतुक निरीक्षक नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक आडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकात चोवीस तास वाहतुक निरीक्षक सेवेवर असले तर प्रवाशांना जो रात्रीच्या वेळी होणारा त्रास आहे तो होणार नाही. जवळपास पन्नास ते साठ गावांचा या बसस्थानकातून प्रवाशांचा प्रवास होत असतो. त्यामुळे या बसस्थानकात चोवीस तास वाहतुक निरीक्षक असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या बाबीचा विचार करुन नळदुर्गला आल्यानंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी नळदुर्गच्या बसस्थानकात चोवीस तास वाहतुक निरीक्षकाची घोषणा करुन प्रत्यक्षात हे पद नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी नागरीकांतून होत आहे. त्याच बरोबर बसस्थानकाच्या बाजून संरक्षक भिंतीला जे अतिक्रमण झाले आहे. त्या अतिक्रमणामुळे बसस्थानकाचे सौंदर्य नष्ठ झाले आहे. त्याच बरोबर अतिक्रमणधारांमुळे अनेक समस्या बसस्थानकात निर्माण झाल्या आहेत. त्या सर्व बाबींचा विचार करुन या बसस्थानकाच्या बाजूने झालेले अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करावी अशी मागणीही नागरीकांतून होत आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडून नळदुर्गकरांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. पण तुर्तास या दोन अपेक्षा पूर्ण झाल्या तर शहर वाशीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 
Top