तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस चालकांना वाहन चालवित असतांना भ्रमणध्वनीचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपञक महाव्यवस्थापक यांनी 27 मार्च 2025 काढले.
परिपञकात म्हटलं आहे कि, रा.प.बस चालकांनी बस चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर करु नये याबाबत विभागांना वेळोवेळी सुचना देवुन सुध्दा वाहन चालवत असताना चालक सर्रास मोबाईलचा वापर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. चालक मोबाईल फोनवर आयपीएल मॅच पाहत असलेबाबतचा व्हिडीओ सदर बसमधील प्रवास करणा-या प्रवाशांकडुन प्राप्त झालेला आहे. सदर तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार चालकांना वाहन चालवित असतांना भ्रमणध्वनीचा वापर करण्यास प्रतिबंध आहे.
वाहन चालवित असतांना हेडफोन व इत्यादी उपकरणाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर सुचना ही रा. प. तसेच भाडेतत्वावरील चालकांना देखील बंधनकारक राहील. चालकांनी स्टेअरिंगवर असताना भ्रमणध्वणीचा वापर करीत असल्याचे निदर्शनांस आल्यास अशा चालकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.