भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील निपाणी येथील तरुण शेतकऱ्याने एकच मिशन मराठा आरक्षण या आशयाची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटया सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान उघडकिस आली आहे. सदरील घटना निपाणी जातेगाव शिवावरील निपाणी शिवारामध्ये घडली आहे. निपाणी येथील रहिवाशी कृष्णा विनायक अनभुले (33) या तरुण शेतकऱ्यांने रवीवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान स्वतःच्या शेतामध्ये जातो असे सांगून शेतात गेला होता. कृष्णा याचा स्वतःचा लेव्हलिंग ट्रॅक्टर आहे कृष्णा याने याच लेवलिंगच्या ट्रॅक्टरच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्म्हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी कृष्णा यांच्या शेजाऱ्याने धारा काढण्यासाठी गेल्यानंतर पहिली. त्यानंतर घटनेची माहिती ईट पोलीस चौकीला कळवली बीट अमलदार अच्युत कुटे व भगवान टिकोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी पार्थिव ईट प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मयत कृष्णा हा अविवाहित होता. तसेच त्याच्या खिषात एकच मिशन मराठा आरक्षण,आरक्षण मिळालेच पाहिजे असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांनी सांगीतले. त्याच्या पाश्चात्य आई,मोठा भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस जमादार अच्युत कुटे व सहकारी भगवान टीकोरे हे करीत आहेत.