तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे चार  पोलिस हेडकाँन्स्टेबल यांची पदोन्नती होवुन आता सहाय्यक पोलिस फौजदार बनले आहेत.      

पोलिस हेड काँन्स्टेबल  गुरुनाथ  ज्ञानोबा लोंखडे,  धनंजय कवडे, राजेश माणिकराव सांळुके, ज्ञानेश्वर दत्तु पोपलायट हे तुळजापूर येथील पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते. हे चारही जण 1993 ला पोलिस सेवेत दाखल झाले आहेत. या सर्वाची तेहतीस वर्ष सेवा झालेली आहे. यात गुरुनाथ लोखंडे  धाराशिव सीआयडी नंतर तुळजापूर येथे सेवेत होते. यांनी सपोफौ धनंजय कवडे येरमाळा अंबी, उमरगा नंतर तुळजापूर येथे सेवेत होते. यांनी शहरासह ग्रामीण भागातील  विविध बीट सांभाळले आहे. यांची पदोन्नती होवुन हे चार जण आता सहाय्यक पोलिस फौजदार बनले आहे. या सर्व सहाय्यक पोलिस फौजदारांचे आता सर्वञ अभिनंदन होत आहे.

 
Top