धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी  कीर्ती किरण पुजार यांनी दि. 27 एप्रिल रोजी केली. या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मेकॅनिकल इंजिनिअर थोरबोले, डेपो मॅनेजर भांगे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बस स्थानकाच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पाहणीच्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली आणि आवश्यक सुधारणा व कामाच्या गतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यामुळे बस स्थानकाच्या विकासकामांना आवश्यक वेग व गुणवत्ता मिळण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


सुविधायुक्त धाराशिव बस स्थानक

धाराशिव येथील एसटी बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून, चालक, वाहक व प्रवाशांसाठी सुविधायुक्त हे बसस्थानक आहे. चालक, वाहक यामध्ये लेडीज असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे विश्रांती कक्ष उभा करण्यात आले आहेत. बसस्थानकावरील माहिती कक्ष अत्याधुनिक पध्दतीने उभारले आहे. पूर्वी सहा प्लॉटफॉर्म होते. नवीन बसस्थानकामध्ये 22 प्लॉटफॉर्म आहेत. धाराशिव जिल्ह्याला आतापर्यंत 35 नवीन बसेस मिळाल्या आहेत. या बस स्थानक उभारणीवर एकूण 11 कोटी रूपये खर्च झाले आहेत. बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम एक-दोन दिवसात होणार आहे. 

विनोद भालेराव, विभाग नियंत्रक एसटी महामंडळ धाराशिव

 
Top