भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूलच्या इयत्ता पाचवी वर्गातील अजिंक्य अतुल शेंडगे व अविष्कार परमेश्वर माने तसेच आठवी वर्गातील सुरज सूर्यकांत सराटे, सुमया अब्दुल अलहमेद,अनुष्का काकासाहेब पाटुळे हे विद्यार्थी पात्र झाले आहेत .सदर विद्यार्थ्यांचा पुष्पहार ,गमजा व पेन देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. प्रास्ताविकात पवार काकासाहेब म्हणाले की, “ ज्यादा तास घेतल्यामुळे व विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाला पवार काकासाहेब, पाटील दयानंद, पायघन उत्रेश्वर, जोशी अविनाश, गुंजाळ दत्तात्रय, श्रीमती वैशाली विधाते,पवार नितीन,शिंदे कैलास, साठे हरीश पालक, नातेवाईक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन अविनाश जोशी यांनी मानले.