तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त बाळगोपाळांना खेळाची मेजवानी मिळत असल्याने यात्रेत गर्दी होत आहे.

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रा सोहळा 23 एप्रिल पासून चालू झाला असून 30 एप्रिल अक्षय तृतीया पर्यंत चालणार आहे.यात्रेनिमीत्ताने यात्रेत मोठा पाळणा,लहान पाळणा,मिक्कीमाऊस,मिक्सर,रेल्वे,ब्रेक डान्स अशा प्रकारचे विविध खेळ खेळण्यासाठी आले असल्याने यात्रेत सायंकाळी बाल गोपाळासह नागरिक गर्दी करीत आहेत.बालगोपाळ विविध खेळाचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

 
Top