धाराशिव (प्रतिनिधी)- महात्मा फुले विशिष्ट युगात महत्व पुर्ण भुमिका निभावणारे महान समाजसुधारक होते. महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य यांचे या काळातील महत्व डॉ. केशव क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात महात्मा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ महापुरुषांंच्या  प्रतिमा पुजनाने करण्यात आला. 

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव हिंदी विभागप्रमुख डॉ. केशव महादेव क्षीरसागर, यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. विद्यापीठ विकास विभाग समन्वयक, डॉ. विक्रम शिंदे यांनी प्रास्ताविक केले.  विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.  डॉ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत व त्यानुसार मार्ग क्रमण करावे. समता सप्ताह निमित्त आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील विविध विभागातील प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top