धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त्‌‍ वाचन कक्ष, ज्ञान स्त्रोत केंद्र येथे वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. 

विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांंच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अधिसभा सदस्य, देविदास पाठक, यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वाचन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी देविदास पाठक यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचनाचे महत्व स्पष्ट केले. वाचनामुळे बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकास होतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थी मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, असे मह्टले. वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक,  तुकाराम हराळकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे, प्रा.डॉ.  गोविंद कोकणे, डॉ. नितिन पाटील, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, डॉ. गणेश शिंदे, डॉ. उषा कांबळे, डॉ. अशोक हुंबे, परिवर्तन जगझाप, विश्वास कांबळे इ. उपस्थित होते. सर्व विभागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

 
Top