धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.व्ही.पी.एज्युकेशनल कॅम्पस छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आपल्या देशात पूजनीय आहे कारण भारतीय समाजाच्या उन्नती आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी शिक्षण, समाज सुधारणा, महिलांचे शिक्षण या क्षेत्रात काम केले आणि कष्टकरी वर्गातील लोकांना चांगले जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचा आदर्शाचा प्रभाव आजही आपल्यामध्ये कायम आहे. यावेळी बी.एड.कॉलेजचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे, प्रा. काकासाहेब पौळ, प्रा. सुकेशनी गव्हाणे, प्रा. अंजुम शेख, प्रा. सुनील बनसोडे, प्रा. दत्तात्रय घावटे, बालाजी मुंढे, अभिरुद्र सुतार, दत्ता काकूर्णे उपस्थित होते.