धाराशिव (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल 2025 रोजी स्वाधार मतिमंद मुलींची शाळा आळणी तालुका जिल्हा धाराशिव येथे एस.बी.आय. एस.सी., एस.टी. व बी.सी. संघटनेच्या पुढाकारातून भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय धाराशिव यांच्या सहकार्याने गणवेश वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर स्वाधार मतिमंद शाळेतील विद्यार्थिनींनी सुरेल असे स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर भारतीय स्टेट बँकेचे धाराशिवचे क्षेत्रीय प्रबंधक नरसिंह कुमार मेहता, अधिकारी संघटनेचे नांदेड झोनचे अध्यक्ष उमेश आडगावकर तसेच सीआरएस किरण जिंतूरकर, सेवा संघटनेचे नांदेड झोनचे अध्यक्ष सदाशिव चाळणेवाड, सेवा संघटनेच्या नांदेड झोनच्या सेवाच्या डीजीएस शिल्पा जिंतुरकर, एसबीआय स्टाफ युनियनचे धाराशिवचे राहुल जोशी, दादा बनसोडे प्रबंधक व विनोद खरात यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी श्री. किरण जिंतूरकर, श्रीमती शिल्पा जिंतूरकर तसेच क्षेत्रीय प्रबंधक मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनीना पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारे शाळेचे मुख्याध्यापक थोडसरे व त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचे कौतुक केले. यापुढेही या प्रकारचे साहाय्य भारतीय स्टेट बँक व संघटनेमार्फत शाळेसाठी करत राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सेवाचे धाराशिवचे रिजनल सेक्रेटरी डॉ. पद्माकर चांदणे व असिस्टंट रिजनल सेक्रेटरी प्रफुल्ल गायकवाड धाराशिव यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कांबळे यांनी केले.