उमरगा (प्रतिनिधी)- समाजातील उत्तम कार्य करणाऱ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन व चालना आहे. समाजात उत्तम कार्य करून इतरांना दिशा दाखविणे हे महान कार्य आहे. शांतीदूत परिवाराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून केलेला गौरव हा प्रेरणादायी असुन येणाऱ्या काळात जोमाने कार्य करता यावे यासाठी बळ देणारा आहे. असे मत उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी व्यक्त केले.
शांतीदुत परिवाराच्या अध्यक्षा विद्याताई जाधव अध्यक्षस्थानी होत्या.शांतिदूत परिवार महाराष्ट्रच्या वतीने 2025 साली च्या सेवारत्न पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते सोमवार (ता.28) रोजी ओम लॉन्स येथे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण स्वामी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड (सोलापूर), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव उपस्थित होते.आमदार प्रविण स्वामी यांनी समाजाला दिशा देण्यासाठी चांगल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सौ.अस्मिता गायकवाड यांनी महीला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असुन मला शांतीदुतच्या माध्यमातुन समाजात मिसळून कार्य करता येते याचे मला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक अश्वीनी भोसले, अमर सुर्यवंशी, अनिल सगर, महमदरफी शेख यांची भाषणे झाली.
डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. ॲड. एस.पी.इनामदार यांनी सुत्रसंचलन केले. प्रा.युसुफ मुल्ला यांनी आभार मानले. प्रा. जिवन जाधव, पद्माकर मोरे, मनेश माणिकवार, संतोष जाधव, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, महंमद रफिक शेख, संतोष जाधव, प्रा. अभयकुमार हिरास, मधू चौधरी पुणे, संतोष मोहिते, नसीरुद्दीन शेख यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी महीला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहियोदिन सुलतान, माजी नगरसेवक विजय दळगडे, महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे सह संचालक डॉ.तुकाराम मोटे,जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी, उद्योजक अनिल सगर, सुमित कोथिंबीरे, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, मंजुषा चव्हाण, ॲड. दिलीप सगर, एसबीआय शाखा प्रबंधक शितल रासकर, अपर्णा पोद्दार, संजय रूपाजी, सुरेश माणिकवार, अशोक जाधव, किसन राठोड, अजय गायकवाड, शेखर आंबेकर, गोविंदराव गायकवाड यांचा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.