धाराशिव (प्रतिनिधी)-  सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील लोक प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकारी मंडळ जाहीर झाले आहे. रविवारी कार्यकारिणीच्या बैठकीत नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदी सुरेखा जगदाळे, उपाध्यक्ष दौलत निपाणीकर तर मुख्य सचिवपदी अनिकेत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या लोकप्रतिष्ठान ही संस्था सामाजिक क्षेत्रात तीस वर्ष पूर्ण करत आहे. या वाटचालीत संस्था आणखी व्यापक व्हावी, यासाठी नवीन कार्यकारी मंडळ नुकतेच स्थापन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा संजय जगदाळे यांची लोक प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली तर उपाध्यक्ष पदावर दौलत निपाणीकर यांची तर मुख्य सचिव पदावर अनिकेत देशमुख यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारी मंडळात सचिव म्हणून यापुढे सुनील मनोहर बडूरकर,  सहाय्यक सचिव विनोद कुलकर्णी आणि सुजितकुमार चंदनशिवे, कार्यकारिणी सदस्य म्हणून अ‍ॅड. राज कुलकर्णी, विश्वदीप खोसे, मंजुषा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात लोक प्रतिष्ठान संस्था पाणलोट विकास कार्यक्रम, विशेष वृक्ष संवर्धन, महिला स्वयंरोजगार निर्माण, ग्रामीण विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणसहाय्य अशा अनेक विषयात नवीन योजना व नवीन तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. तसेच नव्या पिढीतील युवकांना महिलांना संस्था कार्यात सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुरेखा जगदाळे यांनी दिली. 

 
Top