भुम (प्रतिनिधी)- डॉ. संजय जहागीरदार, विशाल काशीद, हिमालय विजय वाघमारे यांची कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शासकीय संस्था), परंडा, जि. धाराशिव येथे महाराष्ट्र शासनाने (संस्था व्यवस्थापन समिती) सदस्य, IMC मेंबर म्हणून नियुक्ती झाली याबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ओ.बी.सी. मोर्चा साहेबराव पाडुळे, ता. उपाध्यक्ष तथा जिल्हा मजुर सहकारी संघाचे संचालक बाबासाहेब जाधव, वैद्यकीय आघाडीचे डॉ. आनंद मोरे, आप्पा मुसळे, गजानन तिवारी, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोज पवार, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे, आकाश मदने, व्यंकटेश दिक्षित, समाधान कोळेकर महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. ज्योती भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top