धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
कोणत्याही परिस्थितीत वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात यावा अशी इच्छा जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त करण्यात आल्यानंतर या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरापासून काही अंतरावर असलेल्या आळणी गावातील स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह या शाळेमध्ये फळ वाटप करण्यात आले. या फळ वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हार तुरे, पुष्पगुच्छ यावर वायफळ खर्च न करता समाजिक उपक्रम राबवावेत व शक्य होईल तेवढी अशा संस्थांना मदत करावी असे आपल्या मनोगता मधुन आवाहन केले.
संस्थेचे सचिव चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या संस्थेतील विद्यार्थिनीसाठी फळ वाटपाचा कार्यक्रम केला याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हातून असेच सत्कार्य होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. फळ वाटपाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी एक सुंदर से गाणे सादर केले.येथील सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचा वाढदिवस जिल्हाभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे आदेश संघटक सचिव खलील पठाण, जिल्हाकार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, धाराशिव शहर कार्याध्यक्ष अकबर खान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वगरे,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, अल्पसंख्यांक धाराशिव शहर अध्यक्ष अराफत काझी,आंबेजवळगा जि प गटप्रमुख सुरेश राठोड आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.