तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घट्टेवाडी येथे पाणी टाकी, पाईप लाईन उपलब्ध असताना ग्रामपंचायत दुर्लक्षीत पणामुळे पाणी असलेल्या बोअर मधुन पाणी नेण्यासाठी ग्रामस्थांना उन्हात पायपीठ करावी लागत आहे. याला ग्रामपंचायत कारभारी, ग्रामसेवक कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधुन केला जात आहे. तरी पाणीटंचाई काळात कर्तव्यात कसुर करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, काटगाव घट्टेवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे. घट्टेवाडीची लोकसंख्या पाचशे आहे. गावात पिण्याचा पाण्यासाठी टाकी बांधली असुन अंतर्गत पाईपलाईन टाकली आहे. पन्नास टक्के घरांना नळकनेक्शन दिले आहे. उर्वरीत ग्रामस्थांना नळसाठी पाईप लाईन साहित्य आणुन घरात ठेवले आहे. पण नळ कनेक्शन दिले जात नाही. विशेष म्हणजे पाणी टाकी ते पाणीपुरवठा बोअर अंतर अवघे तीस फुट असुन बोअरचे पाणी टाकीत टाकुन तेथुन पाणीपुरवठा करणे गरजेचे असताना तशी सोय करणे आवश्यक असताना ती न केल्यांना ग्रामस्थांना बोअरवर पाणी नेण्यासाठी यावे लागत आहे. यामुळे पाणी वाटोळ होवुन सदरील पाण्याचा डोह वड्यात तयार झाला आहे.या बाबतीत सरपंच, ग्रामसेवक यांना सांगुन ही उपाययोजना केली जात नाही. यात शासनाने ग्रामस्थांना सोयीसुविधा देण्यासाठी दिलेल्या निधीचा उपयोग ग्रामपंचायत दुर्लक्ष मुळे होत नाही.