मुरुम ( प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील वाणिज्य विभागाच्या कॉमर्स असोसिएशनच्या वतीने दि २२ जानेवारी २०२६ रोजी मकरसंक्रांतीनिमित्त "माझी आई महाविद्यालयात" हा उपक्रम महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख डॉ अजित अष्टे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेदुला पेठसांगावीकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता आपल्या स्तरावर विचार करत करिअरला प्रथम प्राधान्य द्यावे व उच्च ध्येय ठेवून उदिष्ट गाठले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ वेदुला पेठसांगावीकर यांनी आयोजित कार्यक्रमात केले. तसेच महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून रोटे. सौ. कविता संजय अस्वले, सौ. रोहिणी अजित अष्टे, सौ. शुभांगी ओमप्रकाश पवार, डॉ. विजयकुमार मुळे, डॉ. खंडू मुरळीकर, प्रा. विद्या गायकवाड आदी उपस्थित होते.
सध्या स्पर्धेचे युग असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना नियमित महाविद्यालयात पाठवावे. विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित असले तरच त्यांना ज्ञान व कौशल्य प्राप्त होऊ शकेल. आणि त्यांना नोकरी मिळू शकतील. असे कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात डॉ. अजित आष्टे यांनी प्रतिपादन केले. शिवाय महाविद्यालयात चालणारे उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, करियर कट्टा, पोलिस अकादमी आदीबाबत माहिती दिली. "माझी आई महाविद्यालयात" हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी आपली आई आणि आईवरचे प्रेम कवितेतून सादर करत आभार मानून धन्यवाद व्यक्त केले. याकर्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अक्षता बिरादार यांनी स्वागत गीत गाऊन केले. सूत्रसंचालन प्रा. संध्या चौगुले तर आभार प्रा. विद्या गायकवाड यांनी मानले.
