भूम (प्रतिनिधी)- भूम आगारातील मुस्लिम कर्मचारी यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत १५ मुस्लिम कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन रमजान ईद निमित्त आगारातील चालक, वाहक, कार्यालयीन व तांत्रिक कर्मचारी यांना गुलगुले व शीरखुर्म्याचा अल्पोपहार दिला. आगारातील सर्वधर्मीय कर्मचारी हे गुण्यागोविंदाने सर्व सण समारंभ उत्साहात साजरे करतात. विशेष म्हणजे अल्पोपहाराचा कार्यक्रम हा आगारातील श्री दत्त मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कर्मचारी वर्गाने गुलगुले, तिखट पुरी व शीरखुर्म्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. रमजान ईद दिवशी कामामुळे इतर कर्मचाऱ्यांना घरी येता येत नाही यामुळेच कार्यक्रमाचे नियोजन हे आगारात केले असल्याचे अब्दुल शेख यांनी सांगितले.