कळंब(प्रतिनिधी)-येथील पुनर्वसन सावरगाव मध्ये श्री जय हनुमान मंदिरामध्ये श्री जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त ह . भ .प . बाल किर्तनकार आर्यन  महाराज गोरड माऊली अनाथ आश्रम माळेगाव भोर पुणे  यांचे शुक्रवार  दि . ११ एप्रिल  रोजी रात्री ठीक ९ ते ११  या वेळेत अमृततुल्य असे कीर्तन सेवा होणार आहे . या हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हरी जागरणाचा कार्यक्रम कळंब , करंजकल्ला  या गावचे भजनी मंडळी चा   होणार आहे . तसेच शनिवार  दि . १२   रोजी सकाळी ६ वाजुन ५ मिनिटांनी  हनुमान जन्मोत्सव होईल  नंतर  भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे . तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान जय हनुमान सत्संग मंडळ पुनर्वसन सावरगाव मंदीर समिती  यांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे . 

 
Top