तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीरातील महत्वपुर्ण अशा प्राचीन पिंपळ पार बांधकाम जिर्णोध्दार सुरु करण्यात आले आहे. सदरील पिंपळ पार हा मंदीरातील महत्वाचे असे ठिकाण आहे. सिमोल्लंघनासाठी देवी गर्भगृहा बाहेर पालखी काढली जाते तेव्हा येथे पालखी काही काळ थांबवली जाते. विशेष म्हणजे या पिंपळपाराचे पुर्वीचेच प्राचीन दगडे काढुन ते आहे तिथे पुन्हा बसवले जात आहे.

सदरील पिंपळ पार ओटा पुर्वी उंच होता. तो आता कमी करण्यात येणार आहे. श्रीतुळजाभवानी मंदीरात होमकुंडा लगत पिंपळ पार असुन दस-या दिनी उषकाली श्रीतुळजाभवानी मुख्य मुर्ती सिमोलंघनासाठी मुख्य गर्भगृहा बाहेर पालखीत आणल्यानंतर येथे विसावली जाते. येथे नैवध आरत्या करण्यात आल्यानंतर मग मुख्य मुर्ती सिंह गाभाऱ्यात पलंगवर विश्रांतीसाठी ठेवली जाते. सदरील पिंपळपार हा प्राचीन भव्य पिंपळावृक्ष खाली आहे. सदरील पिंपळ पार उंची चार ते साडेचार फुट उंच ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

 
Top