तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगर परीषद शाळा क्रमांक दोन मधील येथील इ.7 वीत शिकणारा विद्यार्थी शंभू युवराज शिंदे यास कुठलेही मार्गदर्शन नसताना पेन्सिल ले अप्रतीम हनुमान यांचे चित्र साकारले आहे शंभु शिंदे यांचेवडील श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी आहेत.
बाल चित्रकार शंभू युवराज शिंदे यांच्या उत्कृष्ट चित्रकलेबद्दल रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद दादा कंदले यांनी प्रोत्साहन पर पारितोषिक देऊन शंभूचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय चित्रकार खाजाबाई सय्यद व सिद्धार्थ शिंगाडे यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून व भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शंभूचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.