धाराशिव(प्रतिनिधी ) येथील लहुजी शक्ती सेनेकडून सुप्रसिद्ध तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज नाडकर (जगवाले ) यांचा निर्भीड कलम या चॅनलसाठी प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे म्हणाले की, समाधान महाराज यांचा अध्यात्माचा अभ्यास खूप मोठा आहे. महाराष्ट्रभर ते कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहेत. निर्भीड कलम या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ते न्याय मिळवून देतील अशा स्वरूपाचा आशीर्वाद ही प्रा.डॉ .लोंढे यांनी व्यक्त केला. सत्काराबद्दल समाधान महाराज नाडकर (जगवाले) यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष संतोष मोरे प्रा.रवी पोवळे प्रा. स्वप्निल वाकडे आदींसह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.