वाशी (प्रतिनिधी)- वाशी येथील सेवानिवृत्त शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप यांचे नातू प्रीतीश नाईकनवरे यांनी एमबीबीएस च्या अंतिम वर्षाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथून प्रीतीश याचे एम बी बी एस चे शिक्षण झाले असून,आता जिल्हा रुग्णालय,नंदुरबार येथे एक वर्षाची इंटर्नशिप आहे.त्याचा लहान बंधू सुमित नाईकनवरे हा सुद्धा एमबीबीएसच्या अंतिम वर्षात आहे.दोन्ही बंधुचे खुल्या वर्गातून एम बी बी एस () शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश झाला. या यशाबद्दल नातेवाईकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. भविष्यात पोस्ट ग्रेड्युएशन करून धाराशिव मध्ये कमी खर्चामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची त्यांची संकल्पना आहे.