धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने सालाबादाप्रमाणे याही वर्षी एन.एम. एम.एस. या राष्ट्रीय शिष्यवर्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

या सर्वांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. या परीक्षेत तब्बल 53 विदयार्थ्यामध्ये 9 एन एम. एम.एस. धारक विदयार्थ्यांमध्ये आदित्य निलकिरण कांबळे 141 गुण घेऊन प्रथम आला. तर  समर्थ भारत पवार द्वितीय व आदिती विजयकुमार काळे ही तृतीय आल.  तर  प्रथमेश बापू बाराते, सान्वी संतोष कदम, संदेश ज्ञानदेव राठोड, आदित्य सुधाकर जाधवर, श्रीनिवास सोमनाथ उंबरे व स्नेहल अरुण जाधव यांनी या परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवर्ती रुपये बारा हजार त्यांच्या बारावीपर्यंत मिळणार असून 44 सारथीधारक शिष्यवर्ती प्राप्त विद्यार्थांना वार्षिक 9600 रुपये मिळणार आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अध्यापक राजेंद्र जोगदंड, शरद क्षीरसागर, दयानंद शिराळ,शंकर माकणीकर, अर्चना देशमुख, मनिषा काळे, वर्षा तुळजापुरे, अमोल देवकुळे, सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर या विभागाचे प्रमुख कुमार निकम या सर्वांचे व यशस्वी विदयार्थ्यांना संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरुपात फाईल , पेन व फूल देऊन सत्कारित करण्यात आले. तसेच चौथीतून पाचवीत प्रशालेत प्रविष्ट होणाऱ्या विदयार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस  प्रेमाताई सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगतात परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल सर्वांचे कौतुक केले तर अशीच परंपरा कायम ठेवण्यासाठी नवनवीन गोष्टींचा वापर करण्याच्या मौलिक सूचना त्यांनी केल्या. यावेळी  प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, निखिलकुमार गोरे, धनजंय देशमुख, विनोद आंबेवाडीकर व विदयार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.


 
Top