भुम(प्रतिनिधी)- भुम येथील रहिवासी व सध्या व्हर्लपूल कंपनी पुणे येथे कम्प्युटर इंजिनिअर म्हणून जॉब करीत असलेला श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल यांच्या संशोधनाला भारत सरकारच्या वतीने पेटंट मिळाले आहे. हे कार्य खुप कौतुकास्पद असल्याचे मत धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्कार समारंभात व्यक्त केले.

 पुणे येथील पिंपरी चिंचवड इंजीनियरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असताना  श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल यांनी केलेल्या डुडल ॲपच्या प्रतिमा संग्रहणासाठी सुधारीत प्रणाली या संशोधनास भारत सरकारची पेटंट ला मान्यता मिळाली असून त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

त्यांचे यशाबद्दल खासदर ओमराजे निंबाळकर यांनी आज भुम येथे सत्कार केला. यावेळी बोलतांना म्हणाले की, ग्रामीण भागात शिक्षण घेऊन त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे. हे त्यांचे काम कैतुकस्पद आहे. यामुळे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन मालक, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, तालुका प्रमुख अनिल शेंडगे, प्रल्हाद आडगळे, दिपक मुळे, अँड विनोद नाईकवाडी, विनोद जोगदंड, बाळासाहेब गुळमे आदि उपस्थित होते.

 
Top