भूम (प्रतिनिधी)- विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची पिपंरी-चिंचवड येथील राष्ट्रवादीचे नेते नूर खान यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान भूम तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणी व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम-परंडा-वाशी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापुरकर, तसेच एन.एस.यु.आय. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. मुशरफ सय्यद शेखापुरकर हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासन देण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी सामाजिक प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


 
Top